Nagpur च्या कुही येथे 5 महिला पाण्यात बुडाल्या, बोटीतून जात असतानाची घटना | Boat Accident
या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तीन महिला अत्यवस्थ असून त्यांच्यावर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या पाचही महिला मिरची तोडणी आणि कापूस वेचणीच्या कामाला जात होत्या. त्यावेळी ही दुर्घटना घडली.
नागपूर: नागपूरच्या कुही येथे नावेतून जात असताना नाव उलटून पाच महिला बुडाल्या. या पैकी एका महिलेचा मृत्यू झाला असून तीन महिलांची प्रकृती गंभीर आहे. तर एक महिला बचावली आहे. या घटनेमुळे सदर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नागपूर जिल्ह्यातील कुही येथे आज सकाळी पाच महिला पाण्यात बुडाल्या. गोसेखुर्दच्या बॅक वॉटरमधून नावेतून जात असताना नाव बुडाल्याने ही दुर्देवी घटना घडली. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तीन महिला अत्यवस्थ असून त्यांच्यावर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या पाचही महिला मिरची तोडणी आणि कापूस वेचणीच्या कामाला जात होत्या. त्यावेळी ही दुर्घटना घडली. ही घटना घडता पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून दुर्घटनेचा तपास सुरू केला आहे.