Cricket Hobby | जगभरातील आजपर्यंतच्या विविध देशातील क्रिकेट सामन्याची लेखी नोंद, कोण आहे अनोखा क्रिकेटप्रेमी?
VIDEO | आजपर्यंत जगभरात विविध देशामध्ये झालेल्या क्रिकेटच्या सर्व सामन्यांचे रेकॉर्ड नोंदवून ठेवले आहे. मेहकर शहरातील ६५ वर्षीय शंकर तुळशीराम काळे यांना मागील ३० वर्षांपासून जडला अनोखा छंद. शंकरराव काळे हे मेहकर शहरात राहत असून मोलमजुरीचे काम करतात. बघा व्हिडीओ
बुलढाणा, २० ऑगस्ट २०२३ | छंद कोणताही असो, एकदा तो जडला की मग व्यक्तीला वयाचेही भान विसरल्यागत होते. तो त्या छंदाशी एकरूप होतो. असाच एक छंद मेहकर शहरातील ६५ वर्षीय शंकर तुळशीराम काळे यांना मागील ३० वर्षांपासून जडला आहे. त्यांनी आजपर्यंत जगभरात विविध देशामध्ये झालेल्या क्रिकेटच्या सर्व सामन्यांचे रेकॉर्ड नोंदवून ठेवले आहे. शंकरराव काळे हे मेहकर शहरात राहत असून मोलमजुरीचे काम करतात. फरीदाबाद येथे १७ ऑक्टोबर १९९४ रोजी झालेल्या कपमधील भारत विरुद्ध वेस्ट इंडीज या सामन्यापासून शंकर काळे यांनी जगभरात कुठेही झालेल्या आणि कोणत्याही देशाच्या क्रिकेट सामन्याचे रेकॉर्ड लिहण्यास सुरुवात केली. एक दिवसीय सामना असो, कसोटी असो किंवा २०-२० असो, या सर्व सामन्यांमध्ये कोणत्या देशाच्या खेळाडूने किती धावा काढल्या, किती गड़ी बाद झाले, सामानावीर कोण ठरला या बाबतीचे सर्व रेकॉर्ड आज देखील त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.