Solapur | मोहोळ तालुक्यातील अनगर येथे सापडला 66 किलो गांजा

| Updated on: Jul 13, 2021 | 9:17 PM

अनगर येथे एका शेतकऱ्याने बांधावर गांजाची झाडे विक्रीच्या उद्देशाने लावल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी शेतावर जाऊन पाहणी केली असता त्यांना 66 किलो वजनाची 6 लाख 85 हजार रुपये किमतीची गांजा ची झाडे मिळून आली आहेत. 

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील अनगर येथे शेताच्या बांधावर लावलेले 66 किलो वजनाची 65 गांजाची झाडे मिळून आली आहेत. 6 लाख 85 हजार 500 रुपयांचा गांजा मोहोळ पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी शेतकरी हनुमंत धर्मा शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहोळ पोलिसांना अनगर येथे एका शेतकऱ्याने बांधावर गांजाची झाडे विक्रीच्या उद्देशाने लावल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी शेतावर जाऊन पाहणी केली असता त्यांना 66 किलो वजनाची 6 लाख 85 हजार रुपये किमतीची गांजा ची झाडे मिळून आली आहेत.