7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी यावेळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच दिल्ली गाठली आहे. त्यामुळे त्यांनी केंद्रीय नेत्यांना विविध पाच प्रकारच्या मूर्ती सप्रेम भेट देऊन महाराष्ट्राची अनोखी संस्कृतीचे दर्शन दाखविले आहे.
महाराष्ट्रात विधानसभेत मोठा विक्रमी विजय मिळवून देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन ही प्रतिज्ञा खरी करुन दाखविली आहे. राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली येथे पक्ष श्रेष्टींच्या भेटीला आले आहेत. या भेटीत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे अनोखे दर्शन दाखवले आहे. त्यांनी दिल्लीत प्रत्येक नेत्याकडे जातांना त्यांना अनोख्या पाच निरनिराळ्या मूर्ती सप्रेम भेट दिल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी एकूण सात नेत्यांची दिल्लीत भेट घेतली आहे.देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना विठ्ठल-रुख्मिणीची मूर्ती, पंतप्रधान नरेंद्र मोदींना छत्रपती शिवरायांची मूर्ती, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना स्वातंत्र्यवीर सावरकरांची मूर्ती, भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांना गाय-वासरुची मूर्ती,संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग नितीन गडकरी यांना दिली सिद्धिविनायकाची मूर्ती सप्रेम भेट दिली आहे.या भेटीची सर्वत्र चर्चा सुरु आहे.येत्या 14 डिसेंबरला महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. सर्वाधिक भाजपचे मंत्री शपथ घेणार आहेत तर उर्वरित राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे मंत्री मंत्रीमंडळात सामील होणार आहेत.23 -12-9 चा फॅार्म्यूला निश्चित होणार असल्याची शक्यता आहे.