आरक्षण आमच्या हक्काचं, तुम्ही रस्त्यावर या चप्पलेनं हाणते; ८५ वर्षांच्या आजीबाईंचा व्हिडीओ तुफान व्हायरल

आरक्षणाच्या मागणीचा परभणीच्या पूर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे येथील कृशेवर्ता ढोणे या 85 वर्षीय आजीबाईंचा व्हिडिओ व्हायरल होतोय. गरिबीतून आम्ही त्यांना शिक्षण दिले, सरकार तुम्ही आमच्या लेकरांना आरक्षण का देत नाही? असा संतप्त सवाल करताना आजीबाई करत आहे,

आरक्षण आमच्या हक्काचं, तुम्ही रस्त्यावर या चप्पलेनं हाणते; ८५ वर्षांच्या आजीबाईंचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Follow us
| Updated on: Oct 31, 2023 | 2:58 PM

परभणी, ३१ ऑक्टोबर २०२३ | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यात आंदोलनं सुरू आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय सरकार घेत नसल्याने मराठा समाज आता आक्रमक झाला आहे. या आंदोलनाला आता राज्यभरात हिंसक वळण आल्याचे पाहायला मिळत आहे. या दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसताय. यामध्ये मराठा आरक्षण मिळावे यासाठाी लहानग्यांपासून थेट वृद्धमंडळींचा समावेश असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच ८५ वर्षांच्या आजीचा व्हिडीओ सध्या चांगलाच सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. यामध्ये त्यांनी सरकारला धारेवरच धरल्याचे दिसतंय. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे येथील कृशेवर्ता ढोणे असं आजीबाईचं ना असून त्या म्हणताय. “आम्हाला आरक्षण भेटलंच पाहिजे, आमचे लेकरं रोडवर हिंडायलेत. आम्ही गरिबीतून शिकलोय, आम्ही मजुरी करून आमच्या लेकरांना शिकवलंय. आमच्या लेकरांना का देत नाही तुम्ही आरक्षण? या तुम्ही रस्त्यावर मी तुम्हाला चप्पलेने हाणते. आरक्षण आमच्या हक्काचं आहे. तुम्ही आम्हाला आरक्षण द्यायलाच पाहिजे, का देत नाही तुम्ही आम्हाला आरक्षण?”

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.