दिल्लीत होणाऱ्या 98 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर

| Updated on: Oct 06, 2024 | 5:31 PM

98th akhil bharatiya marathi sahitya sammelan : दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी संत साहित्याच्या अभ्यासिक डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी ही माहिती दिली आहे.

Follow us on

९८ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तर यंदाचं होणारं ९८ वं साहित्य संमेलन हे दिल्ली येथे होणार आहे. डॉ. तारा भवाळकर यांचा लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला या विषयांचा मोठा अभ्यास आहे. साहित्य संमेलनाच्या इतिहासात हा बहुमान संपादन करणाऱ्या भवाळकर या सातव्या महिला असून लोकसंस्कृती, नाट्यसंशोधन, संतसाहित्य, एकांकिका, ललितलेखन, लोककला आणि लोकसाहित्य या विषयावर पुष्कळ संशोधन आणि बरंच लिखान त्यांनी केले आहे. यंदाच्या ९८ व्या  संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. तारा भवाळकर यांच्यासह प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील, ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, माजी प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर मुळे, सामाजिक कार्यकर्ते अभय बंग यांची नावे चर्चेत होती. मात्र ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.