मोठी बातमी ! लोकसभा निवडणूक समन्वयासाठी मविआ नेमणार ६ सदस्यांची समिती, ठाकरे गटातून ‘हे’ नाव निश्चित
VIDEO | ठाकरे गटाकडून या समितीमध्ये आणखी एका कोणत्या नेत्याची लागणार वर्णी, ही नावं आहेत चर्चेत
मुंबई : लोकसभा निवडणूक समन्वयासाठी महाविकासआघाडीकडून समिती नेमण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. या समितीमध्ये प्रत्येक पक्षातील दोन नेत्यांचा सहभाग असणार आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूक समन्वयासाठी महाविकासआघाडी ६ सदस्यांची समिती नेमणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर लोकसभा निवडणूक समन्वयासाठी नेमण्यात येणाऱ्या समितीमध्ये ठाकरे गटाकडून कुणाची वर्णी लागणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच लोकसभा निवडणूक समन्वयासाठी नेमण्यात येणाऱ्या महाविकास आघाडीतील समितीसाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं नाव निश्चित झाल्याची मोठी माहिती समोर येत आहे. तर या समितीसाठी दूसरा नेता कोण असणार याचा निर्णय उद्धव ठाकरे घेणार असल्याचेही सांगितले जात आहे. याकरता ठाकरे गटातील सुभाष देसाई, विनायक राऊत, अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांचं नाव देखील चर्चेत आहे. त्यामुळे लवकरच या चार नेत्यांपैकी लोकसभा निवडणूक समन्वयासाठी नेमण्यात आलेल्या समितीमध्ये ठाकरे गटातील आणखी एकाची वर्णी लागणार आहे. त्यामुळे आता हा दुसरा नेता कोण असणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.