संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल, काय आहे नेमकं प्रकरण?

संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल, काय आहे नेमकं प्रकरण?

| Updated on: Dec 11, 2023 | 10:33 PM

यवतमाळच्या उमरखेड पोलीस ठाण्यात भाजपाच्या नितीन भुतड यांनी संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दिली होती. सामना या वृत्तपत्रातून देशविरोधी व्यक्तव्य करून देशद्रोहाचा गुन्हा करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी केल्याचा आरोप राऊतांवर करण्यात आला होता.

यवतमाळ, ११ डिसेंबर २०२३ : उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नेहमीच त्यांच्या वक्तव्याने चर्चेत असतात. संजय राऊत यांच्या रोज होणाऱ्या पत्रकारपरिषदेवरून विरोधक नेहमीच त्यांना घेरण्याचा प्रयत्न करत असतात. तर सामना या ठाकरे गटाच्या मुखपत्रातील अग्रलेख किंवा रोखठोक सदरातून संजय राऊत हे मोदी सरकार, भाजप यांच्यावर निशाणा साधत असतात. मात्र आता संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार असल्याचे समोर आले आहे. कारण खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवतमाळच्या उमरखेड पोलीस ठाण्यात भाजपाच्या नितीन भुतड यांनी संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दिली होती. सामना या वृत्तपत्रातून देशविरोधी व्यक्तव्य करून देशद्रोहाचा गुन्हा करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी केल्याचा आरोप भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी केला होता. इतकेच नाहीतर या तक्रारीवरून संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 153_A 505(2) आणि 124 – A नुसार संजय राऊतांवर हा गुन्हा दाखल झालाय.

Published on: Dec 11, 2023 10:33 PM