भिवंडी तालुक्यातील सॉक्सो कंपनीला भीषण आग

भिवंडी तालुक्यातील सॉक्सो कंपनीला भीषण आग

| Updated on: Jan 07, 2022 | 12:04 AM

भिवंडी तालुक्यातील दापोडा परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. दापोडा परिसरात असलेल्या सॉक्सो या कंपनीला भिषण आग लागली आहे. या घटनेमध्ये कंपनीतील सर्व सामान जळून खाक झाले आहे.

ठाणे : भिवंडी तालुक्यातील दापोडा परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. दापोडा परिसरात असलेल्या सॉक्सो या कंपनीला भिषण आग लागली आहे. या घटनेमध्ये कंपनीतील सर्व सामान जळून खाक झाले आहे. मोठी वित्तहानी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच तीन अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. या कंपनीमध्ये मोजे तयार करण्यात येतात.