पती-पत्नी वाद मिटवण्यासाठी पोलिसात आले पण झालं भलतंच…, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
VIDEO | नाशिकमध्ये भरोसा कक्षात घडली धक्कादायक घटना, वाद मिटवण्यासाठी आले पण मामानं भाचीसाठी उचललं टोकाचं पाऊल
नाशिक, 29 जुलै 2023 | नाशिकमध्ये एक धक्कादायक घडला घडल्याचे समोर आले आहे. नाशिक शहरातील शरणपूर रोड सिग्नल येथे असलेल्या भरोसा कक्षात काल एक धक्कादायक घटना घडली. पती-पत्नी आपला वाद मिटवण्यासाठी नााशिकच्या भरोसा कक्षात आले होते. मात्र तिथे भलतंच काही घडलं. अचानक पत्नीच्या मामाने पतीवर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. अंतर्गत वादामुळे एका जोडप्याचे समुपदेशन सुरू होते. समुपदेशन झाल्यानंतर हे जोडपे आणि नातेवाईक बाहेर गेले. त्यांच्यात आपसात वाद झाल्याने पत्नीच्या मामाने पतीवर चाकूने हल्ला केला. पती शांत उभा असताना पत्नीच्या मामाने अचानक हल्ला केला, त्यामुळे यामागे प्लॅन असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Published on: Jul 29, 2023 07:30 AM