शिवरायांच्या जन्मोत्सवाचा अभूतपूर्व सोहळा, डोळ्याचं पारणं फेडणारी बघा ड्रोन दृश्य

शिवरायांच्या जन्मोत्सवाचा अभूतपूर्व सोहळा, डोळ्याचं पारणं फेडणारी बघा ड्रोन दृश्य

| Updated on: Feb 19, 2024 | 4:14 PM

सोलापुरातील ड्रोन पायलट परमेश्वर पाटील यांनी ही दृश्ये टिपलेली आहेत. शिवरायांच्या या पाळणा उत्सवासाठी हजारो शिवभक्तानी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. रात्री बारा वाजता शिवरायांचा पाळणा उत्सव पार पडला आहे.

सोलापूर, १९ फेब्रुवारी २०२४ : राज्यसह देशभरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. अशातच सोलापुरातील शिवजयंतीच्या सोहळ्याची एकच चर्चा होताना दिसतेय. सोलापुरात शिवजयंती निमित्त पार पडलेल्या पाळणा सोहळ्याची खास ड्रोन दृश्य tv9 च्या प्रेक्षकांसाठी दाखवण्यात येत आहे. सोलापुरातील ड्रोन पायलट परमेश्वर पाटील यांनी ही दृश्ये टिपलेली आहेत. शिवरायांच्या या पाळणा उत्सवासाठी हजारो शिवभक्तानी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. रात्री बारा वाजता शिवरायांचा पाळणा उत्सव पार पडला आहे. शिवजयंती सोहळ्यानिमित्त सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई आणि आतशबाजी करण्यात आली होती. सोलापुरात होणाऱ्या या पाळणा उत्सवाचे यंदाचे चौथे वर्ष आहे. सोलापूर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून शिवभक्त पाळणा उत्सवासाठी दाखल होतांना पाहायला मिळतात.

Published on: Feb 19, 2024 04:14 PM