मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत अधिवेशन पण लोकसभेची आचारसंहिता लागल्यास काय?
फेब्रुवारीत विशेष अधिवेशनाची घोषणा केली मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली तर काय? असा सवाल काँग्रेसने केलाय. आता जर लोकसभेच्या निवडणुका फेब्रुवारीत जाहीर झाल्या तर विशेष अधिवेशन बोलवता येत की नाही?
मुंबई, २१ डिसेंबर २०२३ : मराठा समाजाला कशाप्रकारे आरक्षण मिळणार हे अगदी स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट केली. फेब्रुवारीत विशेष अधिवेशनाची घोषणा केली मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली तर काय? असा सवाल काँग्रेसने केलाय. आता जर लोकसभेच्या निवडणुका फेब्रुवारीत जाहीर झाल्या तर विशेष अधिवेशन बोलवता येत की नाही? तर लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या तरी विशेष अधिवेशनावर कोणतंही बंधन येत नाही. मात्र विशेष अधिवेशनात निवडणुकीवर परिमाण होईल असे निर्णय किंवा कायदे करता येत नाही. निवडणुकीच्या मतांवर परिणाम होईल असे कायदे केल्यास निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकते. पण फेब्रुवारी महिन्यात लोकसभेची निवडणूक आचारसंहिता लागण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट