Dhule | धुळ्यात राजेंद्र बंब यांच्या अडचणीत वाढ

| Updated on: Jun 03, 2022 | 10:58 PM

आतापर्यंत आरोपी बंब यांच्याकडून सव्वा 15 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यात 5 कोटी 13 लाख 44 हजार 530 रुपयांची रोकड व 10 किलो 563 ग्रॅमचे सोने, 7 किलो 721 ग्रॅमची चांदी, 5 कोटी 54 लाख रुपयांचे सोने असा एकूण 10 कोटी 73 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

धुळे : जळगाव पीपल्स बँक पाठोपाठ शिरपूर पीपल्स बँकेतही आरोपी राजेंद्र बंब यांच्या लॉकरमधून आर्थिक गुन्हे शाखा व सहायक निबंधक यांच्या पथकाने आज छापा टाकला. या छाप्यात 10 कोटी 73 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यात काही कोरे चेक, खरेदी खत, सौदा पावतीसह काही डायरी देखील जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्रकारांना दिली आहे. आतापर्यंत आरोपी बंब यांच्याकडून सव्वा 15 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यात 5 कोटी 13 लाख 44 हजार 530 रुपयांची रोकड व 10 किलो 563 ग्रॅमचे सोने, 7 किलो 721 ग्रॅमची चांदी, 5 कोटी 54 लाख रुपयांचे सोने असा एकूण 10 कोटी 73 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Published on: Jun 03, 2022 10:58 PM