मुंबई पुन्हा दहशतवाद्यांच्या रडारवर, मंत्रालय नियंत्रण कक्षातील लँडलाईनवर धमकीचा फोन
VIDEO | मंत्रालय नियंत्रण कक्षातील लँडलाईनवर धमकीचा फोन, 'त्या' फोनमुळे उडाली एकच खळबळ; काय दिली फोनवरून धमकी?
मुंबई, ८ ऑगस्ट २०२३ | राज्यातील मंत्री, नेते आणि पोलीस अधिकारी यांना धमकीचे फोन येत असताना आता स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत दहशतवादी हल्ल्यांचं सावट असल्याचं समोर येत आहे. अशातच मंत्रालय नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आल्याची धक्कदायक घटना घडली आहे. फोन करणाऱ्याने एक-दोन दिवसात अतिरेकी कारवाई करण्याची धमकी दिली. मंत्रालय नियंत्रण कक्षातील लँड लाईनवर काल रात्री 10 वाजता हा फोन आला होता. या फोनमुळे एकच खळबळ माजली असून, मुंबई पोलीस सतर्क झाले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला कांदिवली येथून अटक केली आहे. दरम्यान, वारंवार येणाऱ्या धमकीच्या फोनमुळे मुंबई पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याचे म्हटले जात आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस वेगाने तपास करत आहेत. स्वातंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर या धमकीच्या फोनमुळे पोलीस सतर्क झाले आहेत. पोलीस सदर कॉल ट्रेस करत आहेत. लवकरच आरोपीला अटक होण्याची शक्यता आहे.