पालघरमध्ये अंधश्रद्धेचा विस्फोट; सर्पदंश झालेल्या इसमावर उपचार सुरू असतानाच अघोरी विद्याचा वापर
हा जिल्हा पुढारलेल्या आणि विकसीत अशा मुंबईच्या शेजारी असूनही तो अंधश्रद्धेच्या आहारी गेल्याचे चित्र समोर आले आहे. येथील ग्रामीण रुग्णालयातील एख धक्कादायक प्रकार समोर आल्याने सध्या याची जोरदार चर्चा होत आहे.
पालघर, 9 ऑगस्ट 2023 । मुंबईच्या शेजारी असणारे पालघर जिल्हा हा कोणत्या कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतो. हा जिल्हा पुढारलेल्या आणि विकसीत अशा मुंबईच्या शेजारी असूनही तो अंधश्रद्धेच्या आहारी गेल्याचे चित्र समोर आले आहे. येथील ग्रामीण रुग्णालयातील एख धक्कादायक प्रकार समोर आल्याने सध्या याची जोरदार चर्चा होत आहे. तर यावरून टीका देखील केली जात आहे. येथील तलासरी ग्रामीण रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार झाला असून एका इसमाला सर्पदंश झाल्याने दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान एका मांत्रिकाच्या प्रार्थनेचा आणि अघोरी विद्येचा वापर होत असल्याचा सध्या व्हिडीओ व्हायरल होत आहे. याचदरम्यान त्या रूग्णाची प्रकृती आणखी खालावल्यावने त्याला दादरा नगर हवेलीतील सेलवासा येथील विनोबा भावे रुग्णालयात रेफर करण्यात आलं आहे. तर अशा या गोष्टीची टीव्ही ९ पुष्टी करत नाही