रेल्वे बोगीतच घ्या, चमचमीत जेवणाचा अस्वाद! बोगीतील हे भन्नाट रेस्टॉरंट तुम्ही पाहिलंत का?

रेल्वे बोगीतच घ्या, चमचमीत जेवणाचा अस्वाद! बोगीतील हे भन्नाट रेस्टॉरंट तुम्ही पाहिलंत का?

| Updated on: Aug 14, 2023 | 11:25 PM

VIDEO | भारतीय रेल्वेच्या बोगीत भन्नाट रेस्टॉरंटचा यशस्वी प्रयोग तुम्ही पाहिलात का? नाशिकमध्ये रेल्वे बोगीत रेस्टॉरंट सुरू करण्याची अनोखी कल्पना साकारण्यात आली आहे. भारतीय रेल्वेच्या माध्यमातून कंत्राट देऊन रेस्टॉरंट सुरू

नाशिक, १४ ऑगस्ट २०२३ | नाशिकमध्ये रेल्वे बोगीत रेस्टॉरंट सुरू करण्याची अनोखी कल्पना साकारण्यात आली आहे. नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या बाहेर भारतीय रेल्वेच्या माध्यमातून कंत्राट देऊन हे रेस्टॉरंट सुरू करण्यात आलं आहे. प्रवाशांना आता थेट रेल्वेच्या बोगीत हॉटेलचा अनुभव घेता येणार आहे. या बोगीत टेबल, खुर्च्या आणि उत्कृष्ट अशी सजावट करण्यात आली आहे. रेल्वेच्या वतीने बोगी देण्यात आली असून, कंत्राटी स्वरूपात हे रेस्टॉरंट चालवण्यासाठी देण्यात आले आहे. नागपूर, भुसावळ यानंतर आता नाशिकमधील नाशिकरोड येथे हा अनोखा प्रयोग सुरू करण्यात आला. बघा नेमकं कसं आहे हे आगळं वेगळं रेस्टॉरंट…

Published on: Aug 14, 2023 11:22 PM