‘इतकी भिकार XX’ झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही….’ मुख्यमंत्री शिंदे सरकार, अब्दुल सत्तारांचं वक्तव्य ऐकलंत का?

औरंगाबादमध्ये कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याचा सर्व थरांतून निषेध होत आहे.

'इतकी भिकार XX' झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही....' मुख्यमंत्री शिंदे सरकार, अब्दुल सत्तारांचं वक्तव्य ऐकलंत का?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Nov 07, 2022 | 3:42 PM

औरंगाबादः एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना शिंदे (CM Eknath Shinde) आणि ठाकरे गटातील नेते तसेच इतरही पक्षांचे नेते पातळी सोडून बोलताहेत. राजकारणाचा घसरलेला हा पोत आणखी काय काय ऐकायला आणि पहायला लावणार आहे, असा प्रश्न महाराष्ट्राकडून विचारला जात आहे. ताजं कारण ठरलंय कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा एक व्हिडिओ. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने त्यांना एक प्रश्न विचारला. यावेळी सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना ऑन कॅमेरा शिवीगाळ केली.

काय घडलं? कुठे घडलं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची आज औरंगाबादेत सभा आयोजित करण्यात आली आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघ सिल्लोडमध्ये ही सभा होत आहे. यासाठीच्या तयारीबद्दल आढावा घेण्यासाठी अब्दुल सत्तार यांची मुलाखत सुरु होती. लोकशाही वृत्तवाहिनीच्या एका पत्रकाराने त्यांना विचारलं, सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर देण्यावरून प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवीदेखील घातली. इतकी भिकार– झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ… असं उत्तर त्यांनी दिलं.

पाहा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची भाषा-

सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांच्या ट्विटर हँडलवरूनही हा व्हिडिओ टाकण्यात आला आहे. सदानंद सुळे यांचे हे अधिकृत ट्विटर हँडल आहे, याची पुष्टी अद्याप झालेली नाही. पुरुष सत्ताक विचारसरणीतून आलेलं हे वक्तव्य निंदनीय असल्याची टीका त्यावरून करण्यात आली आहे. यातून त्यांचे चारित्र्य आणि पात्रता दिसून येते, असा टोला या ट्विटरवरून मारण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेसतर्फे या वक्तव्यावरून संताप व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांतर्फे या वक्तव्याचा निषेध केला जातोय.

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.