8 पथकांच्या देखरेखीत विनायक मेटेंच्या अपघाताचा तपास होणार
विनायक मेटे यांच्या अपघाताची सखोल चौकशी केली जाईल, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. 8 पथकांच्या देखरेखीत विनायक मेटेंच्या अपघाताचा तपास होणार आहे.
विनायक मेटे यांच्या अपघाताची सखोल चौकशी केली जाईल, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. 8 पथकांच्या देखरेखीत विनायक मेटेंच्या अपघाताचा तपास होणार आहे. शिवसंग्राम अध्यक्ष विनायक मेटे यांचं अपघातात निधन झालं. मेटेंचे चालक एकनाथ कदम यांचीदेखील चौकशी होणार आहे. एकनाथ कदम यांची मेडिकल तपासणी होणार असून पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरू आहे. विनायक मेटे यांच्या कारला आज पहाटे 5 वाजून 5 मिनिटांनी अपघात झाला. मुंबई-पुणे एक्सप्रेसवर रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला.
Published on: Aug 14, 2022 12:31 PM
Latest Videos