आर्यन खान प्रकरणात मोठी अपडेट, आरोपी डिसुझाचा कोर्टात खळबळजनक दावा; म्हणाला…
VIDEO | सॅम डिसुझाचे याचिकेतून ज्ञानेश्वर सिंग यांच्यावर गंभीर आरोप
मुंबई : आर्यन खान प्रकरणात मोठी अपडेट, आरोपी डिसुझाचा कोर्टात खळबळजनक दावा केला आहे. आरोपी सॅम डिसुझाने याचिकेतून ज्ञानेश्वर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याचिकेत ज्ञानेश्वर सिंग यांना ९ लाख रूपये देण्यात आल्याचा दावा त्याने केला आहे. आर्यन खान प्रकरणात खंडणी उकळण्यात आल्याचा आरोपाखाली सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात सॅम डिसुझा हा पाचवा आरोपी आहे. त्याला या प्रकरणात अंतरिम दिलासा मिळावा म्हणून त्यांने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र या दाखल केलेल्या याचिकेतून त्याने खळबळजनक खुलासे केल्याचे समोर आले आहे. २०२१ मध्ये एका ड्रग्ज प्रकरणात समन्स आल्यानंतर त्या समन्स आणि कारवाईपासून वाचण्यासाठी त्याने लाच मागितली होती. त्यानंतर ९ लाख रूपये त्यांना हवाला मार्फत पाठवण्यात आले होते. या दाव्याने खळबळ उडाली आहे.
Published on: May 26, 2023 02:58 PM
Latest Videos