ठाकरे गटाला धक्का ! ठाकरे गटाच्या ५ खासदारांवर होणार कारवाई, काय आहे प्रकरण?

ठाकरे गटाला धक्का ! ठाकरे गटाच्या ५ खासदारांवर होणार कारवाई, काय आहे प्रकरण?

| Updated on: Aug 11, 2023 | 3:28 PM

VIDEO | ठाकरे गटाच्या खासदारांवर कारवाई होणार, शिंदे गटाच्या कोणत्या खासदाराने केला दावा, ठाकरे गटाच्या खासदारांवर कारवाई होणार असल्याने ठाकरे गटासाठी हा नवा धक्का असणार... कुणी केला दावा आणि काय आहे नेमकं प्रकरण?

नवी दिल्ली, ११ ऑगस्ट २०२३ | संसदेत मोदी सरकार विरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव सादर केला. त्यावर मतदान झाल्यानंतर हा अविश्वास ठरवा फेटाळण्यात आला. त्यामुळे मोदी सरकारवर अविश्वास ठरावाचा काहीच परिणाम झाला नसला तरी ठाकरे गटाला त्याचा फटका बसणार असल्याचे समोर आले आहे. अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने ठाकरे गटाच्या खासदारांना व्हीप बजावला होता. हा व्हीप ठाकरे गटाच्या खासदारांनी पाळला नाही. त्यामुळे ठाकरे गटाच्या खासदारांवर कारवाई होणार असल्याचा दावा शिंदे गटाच्या खासदाराने केला आहे. त्यामुळे हा ठाकरे गटासाठी नवा धक्का असणार आहे. ठाकरे गटाच्या पाच खासदारांवर कारवाई होणार असल्याचंही सांगितलं. लोकसभेचा अविश्वास ठराव आला त्याच दिवशी शिवसेनेच्या खासदारांना व्हीप पाठवला होता. मतदानावेळी केंद्र सरकारच्या बाजूने मतदान करण्याचा रिमायंडर व्हीप ठाकरे गटाच्या खासदारांना पाठवला होता. लोकसभेत शिवसेनेचे 5 खासदार अनुपस्थित होते. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

Published on: Aug 11, 2023 03:27 PM