आदित्य ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, एकनाथ शिंदे दालनात येताच…, काय घडलं बघाच?
मुंबईतील विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सिमेंटच्या रस्त्याबाबत सर्वपक्षीय आमदारांची राहुल नार्वेकर यांनी बैठक बोलवली होती. या बैठकीत नेमकं काय झालं बघा...
सर्व पक्षीय बैठकीत आदित्य ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही समोरा-समोर आलेत. मात्र एकनाथ शिंदे दालनात येताच आदित्य ठाकरे यांनी त्यांना दुर्लक्ष केले आणि लक्ष दुसरीकडे वळवल्याचे पाहायला मिळाले. तर एकनाथ शिंदे दालनात येताच एकनाथ शिंदे यांचे आमदार उभे राहिले मात्र उद्धव ठाकरे यांच्या आमदारांनी एकनाथ शिंदे दालनात आल्यानंतर उभं राहणं टाळलं. मुंबईच्या रस्ते कामांबाबत राहुल नार्वेकर यांनी ही सर्वपक्षीय आमदारांची बैठक बोलावली होती. मुंबईतील विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सिमेंटच्या रस्त्याबाबत सर्वपक्षीय आमदारांची ही बैठक सुरू आहे. एकनाथ शिंदे ज्या खुर्चीत बसले होते. त्याच्या बाजुच्या दोन खुर्च्या सोडून आदित्य ठाकरे त्यांच्या समोर बसल्याचे पाहायला मिळाले. तर याच सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत दृश्य सध्या व्हायरल होत आहेत. याच व्हायरल होणाऱ्या दृश्यात ज्यावेळी दालनात एकनाथ शिंदे यांचा प्रवेश झाला तेव्हा शिंदेंच्या आमदारांनी त्यांना उभे राहून नमस्कार केला पण ठाकरेंच्या आमदारांनी उभं राहणं मात्र टाळलं.

गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...

'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप

वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
