शिंदे-भाजप सरकारनं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही, आदित्य ठाकरे यांचं टिकास्त्र

| Updated on: Feb 14, 2023 | 10:33 PM

VIDEO | मागाठाण्यात शिवसंवाद यात्रेत आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर केला हल्लाबोल

मुंबई : जनतेतली प्रत्येकाला वाटायचं की आमचा माणूस आणि आमचा कुटूंब प्रमुख हा उद्धव ठाकरे आहे. मविआचं सरकार होतं तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना विचारण्यात आलं की कोणतं काम करायला आवडेल? त्यावेळी त्यांनी सांगितले की, मला शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करायला आवडेल आणि त्यांनी ते करून दाखवलं, असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तर कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी त्यांनी त्वरीत नुकसान भरपाई दिली आणि जी मदत हवी ती तात्काळ दिली, पण आजच्या काळात बघाल तर मदत मागण्यासाठी कोणाकडे जायचे हे शेतकऱ्यांना माहिती नाही. शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना शेतीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई दिली नाही असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर केला, ते मुंबईतील मागाठाण्यात शिवसंवाद यात्रेत बोलत होते.

 

 

 

Published on: Feb 14, 2023 10:33 PM
म्हणून उद्धव ठाकरे यांना जनतेनं घरी बसवलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
देवेंद्र फडणवीस जे बोलले त्यामागे नक्कीच तथ्य…, ‘महाराष्ट्राचा महासंकल्पा’तील गौप्यस्फोटावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया