Disha Salian : आदित्य ठाकरे यांना कोंडीत पकडण्यासाठी सरकारचा प्रयत्न? आजच SIT ची स्थापना होणार?

Disha Salian : आदित्य ठाकरे यांना कोंडीत पकडण्यासाठी सरकारचा प्रयत्न? आजच SIT ची स्थापना होणार?

| Updated on: Dec 12, 2023 | 10:50 AM

दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी एसआयटी चौकशी स्थापन करण्याचे राज्य सरकारकडून लेखी आदेश देण्यात आले आहे. राज्य सरकारकडून अशाप्रकारे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत, आदित्य ठाकरे यांना कोंडीत पकडण्यासाठी सरकारचा प्रयत्न का?

मुंबई, १२ डिसेंबर २०२३ : दिशा सालियान आत्महत्या प्रकरणात आजच SIT ची स्थापना होणार आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळतेय. दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी एसआयटी चौकशी स्थापन करण्याचे राज्य सरकारकडून लेखी आदेश देण्यात आले आहे. राज्य सरकारकडून अशाप्रकारे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत, असेही सांगितले जात आहे. तर आदित्य ठाकरे यांना कोंडीत पकडण्यासाठी सरकारचा प्रयत्न का? असा सवाल उपस्थित करून याप्रकरणी सध्या चर्चा होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. तर गेल्या वर्षीच्या हिवाळी अधिवेशानतही हा मुद्दा गाजला होता. दरम्यान, विरोधकांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आवाज उठवत आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्याचेही पाहायला मिळाले. नुसते आरोपच नाहीतर त्यांची एसआयटी चौकशी करण्यात यावी अशीही मागणी केली होती. दरम्यान राज्य सरकार या प्रकरणी पुन्हा एकदा पाऊलं उचलताना दिसतंय. त्यामुळे आता दिशा सालियान या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या चांगल्याच अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Published on: Dec 12, 2023 10:50 AM