‘सत्तेची भाकरी खाण्यासाठी दीपाली ताई वेगवेगळ्या पक्षात फिरतायंत’, मनसेच्या नेत्याचा हल्लाबोल
VIDEO | अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी मनसेच्या खड्ड्यांच्या आंदोलनावर सडकून टीका केल्यानंतर मनसे नेते संतोष धुरी यांचं दिपाली सय्यद यांच्यावर जोरदार टीकास्त्र, काय केला मनसे नेते संतोष धुरी यांनी हल्लाबोल?
मुंबई, १९ ऑगस्ट २०२३ | अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी मनसेला रस्त्यांच्या खड्ड्यांबाबत सुरू असलेल्या आंदोलनावरून चांगलंच डिवचलं. ट्वीट करत दीपाली सय्यद यांनी मनसैनिकांना सल्ला देत राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. यावरून मनसे नेते संतोष धुरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ‘दिपाली ताई सत्तेची भाकरी खाण्यासाठी या पक्षातून त्या पक्षात फिरताय ना सत्तेची फुकटची भाकरी खा तुम्ही आम्हाला तिकडे काही घेणं देणं नाही’, असे म्हणत मनसे नेते संतोष धुरी यांनी दिपाली सय्यद यांच्यावर टीका केली आहे. जर कोणावरही अन्याय होत असेल तर मनसेचे शंभर टक्के लाथ पडणार असा इशाराही त्यांनी दिला. मुंबईमध्ये ज्यावेळी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते त्यावेळी आम्हीच इंजिनीयरला त्याच खड्ड्यात उभे देखील केले होते आणि त्यामुळे आम्ही जेलमध्ये देखील गेलो होतो त्यानंतर तात्काळ रस्ते दुरुस्ती देखील झाले आहेत, असेही म्हणत याआधी घेतलेली भूमिकाही त्यांनी सांगितली.