Video : दिल्लीनंतर आता मुंब्रामध्ये अग्नितांडव! एम जे कम्पाऊंडमधील 4 ते 5 गोदामं जळून खाक

Video : दिल्लीनंतर आता मुंब्रामध्ये अग्नितांडव! एम जे कम्पाऊंडमधील 4 ते 5 गोदामं जळून खाक

| Updated on: May 14, 2022 | 10:00 AM

दिल्लीमधील आगीची घटना ताजी असतानाच मुंब्रामध्ये अग्नितांडवाच्या घटनेनं एम जे कम्पाऊंडमध्ये खळबळ उडाली होती.

ठाणे : मुंब्रामधील एम जे कंपाऊडमध्ये चार ते पाच गोदामं जळून खाक झाली आहे. आगीत पाच गोदामं जळून खाक झाली आहे. या आगीमुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, या आगीची माहिती मिळताच अग्निशमनचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तातडीनं ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. गोदामांमध्ये प्लास्टिकच्या भंगाराचं सामान होतं. प्लास्टिकच्या सामानामुळे आग अधिकच भडकली. मुंब्रामधील या आगीत जीवितहानी झाल्याचं अद्यापतरी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र भंगाराच्या गोदामांचं मोठं नुकसान या अग्नितांडवात झाल्याचं पाहायला मिळालंय. गोदामातील प्लास्टिकच्या वस्तू आगीत जळून खाक झाल्या आहेत. यावेळी आगीचे मोठे लोट हवेत पसरले होते. दूरवर पसरलेल्लाय धुरामुळे या आगीची दाहकता अधोरेखित केली होती. रात्रीच्या सुमारास लागलेली ही आग सकाळी उशिरापर्यंत धुमसत होती. भिवंडी आणि मुंब्रा भागात अनेकदा गोदामांना आग लागण्याच्या घटना सातत्यानं समोर येतात. मात्र त्यानंतरही याची गंभीर दखल घेतली जात नसल्याचा आरोप केला जातो. दिल्लीमधील आगीची घटना ताजी असताना मुंब्रामध्ये अग्नितांडवाच्या घटनेनं एम जे कम्पाऊंडमध्ये खळबळ उडाली होती. तर तिकडे दिल्लीतल आगीमध्ये एकूण 27 जण जिवंत जळाले. अथक प्रयत्नांनंतर ही आग नियंत्रणात आणण्यात आली. जवळपास 50 हून अधिक जणांना दिल्लीच्या एका व्यावसायिक इमारतीला लागलेल्या आगीतून वाचवण्यात आलं. तर अनेकजण बेपत्ता असल्याचंही सांगितलं जातंय. आगीच्या वाढत्या घटनांनी यामुळे चिंता व्यक्त केली जातेय.

 

Published on: May 14, 2022 09:46 AM