संभाजी भिडे यांच्या वक्तव्यांच्या मालिकेला ‘नो ब्रेक’! कोणा-कोणाचा केला अपमान, कारवाई होणार?
VIDEO | संभाजी भिडे यांना नेमकं झालं तरी काय? कोणा-कोणाचा केला अपमान, कारवाई होणार? बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई, 31 जुलै 2023 | संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याची मालिका थांबायचं काही नाव घेत नाहीये. अमरावतीच्या एका कार्यक्रमात भिडे यांनी फक्त महात्मा गांधी यांचा अपमान केला असं नाही तर भिडे हे महात्मा ज्योतिबा फुले आणि साई बाबा यांच्याबद्दल बोलल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. दुसरीकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर भिडे अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी कोर्टात धाव घेण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. सर्व समाजसुधारक नालायक होते, अशी टीका करता भिडे यांनी अर्वाच्य भाषेचा वापर केला. अमरावतीमधील एका कार्यक्रमाचा व्हिडीओ समोर आला यामध्ये संभाजी भिडे यांनी आपल्या अक्क्लेचे तारे तोडल्याचे समोर आले आहे. महात्मा गांधी यांच्यानंतर भिडे यांनी थेट स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली आहे. ‘नेहरुंचं भारतावर थोडंही प्रेम नव्हतं. कोणतंही कर्तृत्व नसताना नेहरू पंतप्रधान झाले.नेहरूंचं भारतासाठी नखाएवढंही योगदान नाही. त्यांनी चीनसोबत केलेला पंचशील करार भारताला मारक ठरला. त्यांच्या चुकीमुळे चीनने आपला पराभव केला आणि ईशान्येकडील भूभाग गिळंकृत केला. हा भूभाग परत मिळविण्यासाठी आजपर्यंत कोणीच प्रयत्न केले नाहीत. सर्व लोकप्रतिनिधीही गप्प आहेत’, असं वक्तव्य यवतमाळमध्ये झालेल्या व्याख्यानात संभाजी भिडे यांनी केले आहे.