शरद पवार यांच्या इशाऱ्यानंतर सुनील शेळकेंच्या ‘त्या’ आव्हानाला सुप्रिया सुळे यांचं प्रतिआव्हान
कार्यकर्त्यांना दमदाटी केल्यावरून शरद पवारांनी सुनील शेळके यांना इशारा देत सुनावलं. या इशाऱ्यानंतर सुनील शेळके यांनी देखील पवारांना चॅलेंज दिलं आहे. .... अन्यथा सर्व आरोप खोटे केल्याचे राज्यभर सांगणार', असे शेळकेंनी म्हटले. यावर सुप्रिया सुळेंचं प्रतिआव्हान काय?
पुणे, ८ मार्च २०२४ : मेळाव्याला येऊ नये, म्हणून कार्यकर्त्यांना दमदाटी केल्यावरून शरद पवारांनी सुनील शेळके यांना इशारा देत सुनावलं. या इशाऱ्यानंतर सुनील शेळके यांनी देखील पवारांना चॅलेंज दिलं आहे. ‘कुणाला दम दिला? एक तरी व्यक्ती आणून दाखवा, अन्यथा सर्व आरोप खोटे केल्याचे राज्यभर सांगणार’, असे शेळकेंनी म्हटले. यावर सुप्रिया सुळेंनी शेळकेंना प्रतिआव्हान दिलं आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझ्या पोटात अनेक गोष्टी राहतात. माझ्या समोर कॅमेरा आला म्हणून चॅनलवर मी काही सगळं बोलत नाही. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे. तुम्ही बोला जरूर लोकशाहीत तो अधिकार आहे. माझी सुनील शेळके यांना विनम्र विनंती आहे, शरद पवार जर खोटं बोलताय हे सुनील शेळके यांना वाटत असेल तर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करावा, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी सुनील शेळके यांना प्रतिआव्हान दिलं आहे.