नव्या आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर पुणे शहरातील टोळ्यांच्या म्होरक्यांची ओळख परेड, बघा व्हिडीओ
पुण्यात नवीन आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पुणे शहरातील कुख्यात गुंडांना पोलीस आयुक्त कार्यालयात हजर करत करण्यात आलं आहे. गजा मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळ यांसह अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पुण्यातील पोलीस आयुक्तालयात ओळख परेड
पुणे, ६ फेब्रुवारी २०२४ : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या केल्यानंतर पुण्यात एकच दहशतीचं वातावरण परसलं होत. दरम्यान, पुण्यात नवीन आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पुणे शहरातील कुख्यात गुंडांना पोलीस आयुक्त कार्यालयात हजर करत करण्यात आलं आहे. गजा मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळ यांसह अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पुण्यातील पोलीस आयुक्तालयात ओळख परेड झाली. पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी जवळपास दोनशे ते तीनशे गन्हेगारांना आज पोलीस आयुक्तालयामध्ये हजर करण्यात आलं आहे. दरम्यान, पुणे शहरातील पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हेगारांवर ज्यांच्यावर गुन्ह्यांची नोंद आहे त्यांना सर्वांना पोलीस आयुक्तालयामध्ये बोलावण्यात आलं होतं. यावेळी त्यांची विचारपूसही करण्यात आली आणि चांगलीच ओळख परेड करण्यात आली.