मिंधे, गद्दार, खुद्दार, फुसका बार अन् शाब्दिक गोळीबार; खेडच्या सभेनंतर पुन्हा शिवसेना Vs ठाकरे आमने-सामने
VIDEO | खेडच्या सभेनंतर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि ठाकरे आरोप-प्रत्यारोप, बघा Tv 9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : रत्नागिरीतील खेडच्या गोळीबार मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली. त्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेवर ठाकरे गटातील नेत्यांनी पुन्हा टीकास्त्र सोडले आहे. खेडच्या सभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि ठाकरे गटाचे नेते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेडच्या त्याच गोळीबार मैदानातून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या गद्दार या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. द्या गोळाबार मैदानावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तोफ उद्धव ठाकरे यांच्यावर धडाडली त्याच मैदानावरून दोन आठवड्यांपूर्वी शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर शाब्दिक गोळीबार केला होता. पण याच गोळीबाराला एकनाथ शिंदे यांनी थेट फुसका बार म्हटलं. खेडच्या सभेनंतर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोपांची मालिका, बघा Tv 9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट