AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईसह आसपासच्या परिसरात NIA कडून छापेमारी, इसिस मॉड्युलशी संबधित छापे

| Updated on: Aug 05, 2023 | 3:46 PM

VIDEO | अदनान अली सरकारच्या अटकेनंतर एनआयएने ही छापेमारी, भिवंडीच्या पडघ्यातून अकिब नाचन हा सध्या एनआयएच्या ताब्यात

मुंबई, ५ ऑगस्ट २०२३ | मुंबईसह आसपासच्या परिसरात NIA कडून छापेमारी सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. एनआयएकडून मुंबईत इसिस मॉड्युलशी संबंधित ही छापेमारी सुरू आहे. अदनान अली सरकारच्या अटकेनंतर एनआयएने ही छापेमारी मुंबईसह आसपासच्या परिसरात सुरू केली आहे. तर मुंबई, भिवंडी आणि इतर परिसरात हे छापे सुरू असल्याची माहिती मिळत असून भिवंडीच्या पडघ्यातून अकिब नाचन हा सध्या एनआयएच्या ताब्यात आहे. दहशतवादी कृत्यामध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून भिवंडीतील पडघा येथून बोरिवली या गावातून अकिब नाचन नावाच्या संशयिताला सध्या एनआयएच्या ताब्यात आहे. आज पहाटे ४ वाजता ही कारवाई करण्यात आली आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात काही संशयित दहशतवादी पकडले गेले होते. त्यांच्यासी याचा काही संबंध आहे का, याचा तपास देखील घेतला जात आहे.

Published on: Aug 05, 2023 03:46 PM