आमदार अपात्रतेबाबत आज पुन्हा सुनावणी, काय होणार फैसला? विधानसभा अध्यक्षांकडे महाराष्ट्राचे लक्ष
VIDEO | महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठ्या बंडखोरीचं आणि आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरणावर आज पुन्हा एकदा सुनावणी? विधानसभा अध्यक्षांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष, काय होणार फैसला
मुंबई, २५ ऑक्टोबर, २०२३ | आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष आज तातडीची सुनावणी घेत आहेत. ही सुनावणी लाईव्ह दाखवण्याची मागणी करतानाच, विरोधकांनी अध्यक्षांवर जोरदार निशाणा साधलाय. त्याला सत्ताधाऱ्यांनीही उत्तर दिलंय. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठ्या बंडखोरीचं आणि आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण अद्यापही प्रलंबित आहे. आता आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांसमोर आज पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. विधिमंडळाच्या अधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटातील 54 आमदारांना नव्यानं नोटीस पाठवून सुनावणीसाठी बोलावलंय. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनाही गरज लागली तर सुनावणीला बोलावू असं विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी म्हटलंय. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणी 18 सप्टेंबरला झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली. दरम्यान त्यामुळे आज होणाऱ्या सुनावणीकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.