तुळजाभवनी मंदिर प्रकरणानंतर आता ‘या’ मंदिरात तोकड्या कपड्यांना बंदी, काय लावले बॅनर्स
VIDEO | तुळजाभवनी मंदिर प्रकरणानंतर 'या' मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंग प्रदर्शक वस्त्र घालण्यास मनाई असल्याचे बॅनर्स
सोलापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरासाठी ड्रेस कोडची नियमावली तयार करण्यात आल्याचे समोर आले होते आणि अवघ्या काही तासात तुळजाभवानी मंदिर संस्थानने या निर्णयावरुन यु टर्न घेतल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, तुळजाभवानी मंदिर परिसरात याबाबत फलकही लावण्यात आले होते. तुळजाभवानी मंदिरात अंगप्रदर्शन करणारे वेस्टर्न कपडे घालणाऱ्यांना नो एन्ट्रीचा निर्णय घेण्यात होता. याबाबतचा निर्णय घेतल्यानंतर तुळजाभवानी मंदिर संस्थानने मंदिर परिसरात याबाबतचे फलक लावले होते. पण या निर्णयावर सोशल मीडियावर अनेकांकडून आक्षेप घेण्यात आल्याचे पाहायला मिळाले. मात्र तो निर्णय मागे घेतला असून तसे बॅनर काढण्यात आले आहे. यानंतर आता सोलापूरमधील सिद्धेश्वर मंदिरात तोकडे कपडे घालून येण्यास बंदी घातली आहे. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर राच्या मंदिरात अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य आणि अशोभनीय वस्त्रधारी व्यक्तींना मंदिरात प्रवेश नाही. त्याचबरोबर हाफ पॅन्ट, बर्मुडाधारींना मंदिरात प्रवेश नाही अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आले. श्री सिद्धरामेश्वरांच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंग प्रदर्शक वस्त्र घालण्यास मंदिरात मनाई असल्याचे बॅनर्स लावले असून मात्र हे बॅनर्स कोणी लावले याबाबत अद्याप अस्पष्टता असल्याचे दिसतेय.