Onion Export : भारती पवार यांच्या घराबाहेर ‘डेरा डालो’ आंदोलन, शेतकऱ्यांची मागणी काय?
नाशिकच्या चांदवड तालुक्यातील शेतकरी आणि प्रहार संघटनेच्या वतीने भारती पवार यांच्या निवासस्थानी 'डेरा डालो' आंदोलन करण्यात येणार आहे. तर याच मागणीसाठी भारती पवार यांच्या निवासस्थानी बाईक रॅली देखील काढण्यात येणार
नाशिक, १० डिसेंबर २०२३ : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यानंतर नाशिक जिल्ह्यात या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलन केले. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी, कांदा उत्पादकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी तातडीने उठवावी, या प्रमुख मागणीसाठी आज नाशिकमध्ये केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या निवासस्थानी आंदोलन होणार आहे. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील शेतकरी आणि प्रहार संघटनेच्या वतीने भारती पवार यांच्या निवासस्थानी ‘डेरा डालो’ आंदोलन करण्यात येणार आहे. तर याच मागणीसाठी भारती पवार यांच्या निवासस्थानी बाईक रॅली देखील काढण्यात येणार आहे. या मोर्चा आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारती पवार यांच्या नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात असल्याचे पाहायला मिळत आहे.