सुरेश धसांच्या आरोपांवर किरण जाधव यांनी बोलणं टाळलं, tv9 चा कॅमेरा बघताच ठोकली धूम
सुरेश धस किरण जाधव याच्यावर आरोप करताना असे म्हणाले की, अनेक डिलर मित्र असून किरण जाधव आता राज्याच्या दक्षता पथकाचे प्रमुख आहे. सहा महिन्यांत पाच कोटी रुपयांचे कलेक्शन करण्यात आलं आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील लिंकिंग प्रकरणी खळबळजनक गंभीर आरोप केले. राज्यात ३० अधिकारी असून त्यांच्या नावे ४३ कंपन्या अस्तित्वात असल्याचे सुरेश धस म्हणाले, इतकंच नाहीतर त्या कंपन्यांनी तयार केलेला माल लिंकिंग करून शेतकऱ्यांच्या माथी बियाणे मारला, असा आरोप देखील सुरेश धस यांनी काल केला होता. दरम्यान सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात टीव्ही ९ मराठीने कृषी विभागातील उपसंचालक किरण जाधव यांना विचारणा केली असता त्यांनी बोलणं टाळलं. सुरेश धसांनी केलेले आरोप खरे की खोटे आहेत? असा सवाल केला असता किरण जाधव यांनी टीव्ही ९ मराठीचा कॅमेरा बघून काढता पाय घेतला. ‘वरिष्ठांची परवानगी घेतल्यानंतर सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांवर शासनाच्या दृष्टीने बोलणार आहे’, असं भाष्य करत किरण जाधव यांनी अधिक बोलणं टाळल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, सरकारमध्ये नोकरी करताना नातेवाईकांच्या नावावर आणि पत्नीच्या नावावर कंपन्या करण्यात आल्या असून कृषी विभागातील आका किरण जाधव हे आहे. किरण जाधव यांच्या कार्यकाळात हजारो परवाने दिले गेले असल्याचे म्हणत आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील लिंकींग प्रकाराबाबत खळबळजनक आरोप करत किरण जाधव यांच्यावर निशाणा साधला होता.