भाजप अशा मंत्र्याला कसे काय पाठीमागे घालू शकतो? आदित्य ठाकरे यांचा सवाल
उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्तार यांच्यासह शिंदे-भाजप सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे
मुंबई : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही असे म्हटलं होतं. त्यावर आता सभागृहात आणि राज्यात देखील राजकारण चांगले तापलेलं आहे. सत्तार यांचा निषेध केला जात असून मंत्रीमंडळातून त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी विरोधक करत आहेत. तर विधानसभेच्या पायऱ्यांवर देखील विरोधकांनी सत्ता यांच्या विरोधामध्ये आंदोलन केलं. यावरून उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्तार यांच्यासह शिंदे-भाजप सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच अशा मंत्र्याला भाजप का पाठीमागे घालत आहे असा सवाल दखिल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच अब्दुल गद्दार.. सॉरी अब्दुल सत्तार असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी सत्तार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अब्दुल सत्तार त्यांच्या परिसरात गद्दार म्हणूनच ओळखले जातात. अब्दुल सत्तार मंत्री झाले त्यावेळेपासून काही ना काही ते बोलत असतात. ज्यामुळे लोकांच्या भावना दुखावतात. सत्तार यांच्याकडे कृषिमंत्री पद असूनही ते शेतीवर काही बोलत नाहीत.