मुख्यमंत्री बदलाचा दावा करणे, त्यावर चर्चा करणे व्यर्थ; अजित पवार, जयंत पाटील यांना शिवसेना नेत्याचा टोला

मुख्यमंत्री बदलाचा दावा करणे, त्यावर चर्चा करणे व्यर्थ; अजित पवार, जयंत पाटील यांना शिवसेना नेत्याचा टोला

| Updated on: May 01, 2023 | 9:03 AM

सत्तार भावनेच्या भरात बोलले, अशी सारवासारव राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली होती. यानंतर आता अजित पवार यांच्या भावी मुख्यमंत्रीच्या चर्चांना उधान आलं आहे.

हिंगोली : राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील मुख्यमंत्रीपदाच्याही पुढे जावे, असे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर एकच चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर शिंदे गटात आणि भाजपमध्ये मीठ पडल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर सत्तार भावनेच्या भरात बोलले, अशी सारवासारव राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली होती. यानंतर आता अजित पवार यांच्या भावी मुख्यमंत्रीच्या चर्चांना उधान आलं आहे. त्यावरून अब्दुल सत्तार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी जोपर्यंत केंद्र सरकारची दोन महाशक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहेत तो पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेच राहतील असा दावा केला आहे. तर मुख्यमंत्री बदलाचा दावा करणे, त्यावर चर्चा करणे व्यर्थ आहे.

Published on: May 01, 2023 09:03 AM