Video : भाषण सुरु असताना त्यांनी मोबाईल बघितला म्हणून अब्दुल सत्तार यांना राग आला?

Video : भाषण सुरु असताना त्यांनी मोबाईल बघितला म्हणून अब्दुल सत्तार यांना राग आला?

| Updated on: Sep 24, 2022 | 11:09 AM

Abdul Sattar in Washim : मोबाईलमध्ये काहीतरी करत असलेल्या एका व्यक्तीवर अब्दुल सत्तार भाषण थांबवूनच कडाडले. त्यामुळे उपस्थितही अवाक् झाले होते. वाशिममधील सभेत बोलताना हा किस्सा घडला.

विठ्ठल देशमुख, प्रतिनिधी, वाशिम : कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar Video) यांचा सभेतील एक व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये अब्दुल सत्तार हे सभेसाठी आलेल्या एकावर श्रोत्यावर संपातल्याचं पाहायला मिळालं. ‘ओ साहेब, तुम्ही बीझीए माहितीए, आधी मोबाईल बंद करा आणि आमचं ऐका’, असं अब्दुल सत्तार यांनी समोर उपस्थित असलेल्या एकाला उद्देशून म्हटलं. त्यानंतर ते पु्न्हा भाषण करु लागले. मोबाईलमध्ये (Mobile) काहीतरी करत असलेल्या एका श्रोत्यावर अब्दुल सत्तार भाषण थांबवून कडाडले. त्यामुळे उपस्थितही अवाक् झाले होते. वाशिममधील सभेत बोलताना हा किस्सा घडला. शुक्रवारी कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे वाशिम (Abdul Sattar in Washim) जिल्ह्याच्या एक दिवसीय दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी वाशिम जिल्ह्यातील मालेगावमध्ये फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या प्रयोगशाळेला भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी मंगरुळपीर येथील शिवसेनेच्या संपर्क मेळाव्याला संबोधित केलं होतं. नेमकं काय वेळी भरसभेत काय घडलं, पाहा व्हिडीओ…

Published on: Sep 24, 2022 11:09 AM