‘… तर याद राखा’, अहिल्यादेवींचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांचा इशारा
VIDEO | अहिल्यादेवींच्या जयंती वेळी वाद का निर्माण होतात? वंशज भूषणसिंह राजे होळकर यांचा सवाल
सोलापूर : चौंडी येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीवरून होणाऱ्या वादावर अहिल्यादेवींचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी इशारा दिला आहे. जातीपातीचे राजकारण कोणी केले तर याद राखा भूषणसिंह होळकर त्यांच्यासमोर आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी जातीपातीच्या पुढे जाऊन काम केलं आहे. मात्र आज सर्वच राजकीय पक्ष दुर्दैवाने त्याचा राजकीय वापर करून घेत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर तरुण आणि समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दिसतो, मात्र तो होऊ नये एवढी अपेक्षा, असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले. पुढे ते असेही म्हणाले की, चौंडी ही पवित्र भूमी आहे, तिथे राजकारण बाजूला ठेवून जयंती साजरी व्हायला हवी. रायगड, शिवनेरी या ठिकाणी ज्या पद्धतीने सोहळे साजरे होतात मग अहिल्यादेवींच्या जयंतीवेळी वाद का निर्माण होतात? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. भोसले किंवा होळकर घराण्याने कधीही जातीपुरतं काम केले नाही, सर्वांना सोबत घेऊन काम केले असल्याचेही त्यांनी म्हटलं.