महाविकास आघाडीच्या हातून सत्ता निसटली अन् ‘ही’ निवडणूक भाजपने जिंकली….
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीत महाविकास आघाडीला धक्का बसलाय. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे शिवाजीराव कर्डिले यांची निवड झाली आहे.
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीत महाविकास आघाडीला धक्का बसलाय. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे शिवाजीराव कर्डिले यांची निवड झाली आहे. महाविकास आघाडीची 4 मत फुटली. महाविकास आघाडीची मतं फुटल्याने शिवाजी कर्डिले यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. महाविकास आघाडीच्या ताब्यात असलेली सहकारी बँक भाजपच्या ताब्यात आली आहे. महाविकास आघाडीचे उदय शेळके यांच्या निधनानंतर झाली अध्यक्ष पदाची निवडणूक लागली यात भाजपचा विजय झालाय. महाविकास आघाडी कडून चंद्रशेखर घुले यांना अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिलेली असताना शिवाजीराव कर्डिले यांनी अध्यक्षपदासाठी दावेदारी केल्याने निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात शिवाजीराव कर्डिले यांना 10 तर चंद्रशेखर घुले पाटील यांना 9 तर एक मत बाद झालं आहे.
Published on: Mar 08, 2023 03:54 PM
Latest Videos