AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशी लग्न पत्रिका होणे नाही ! नातेवाईकांच्या नावांऐवजी सरकारी योजनांची नावं, कुठं होतेय चर्चा?

अशी लग्न पत्रिका होणे नाही ! नातेवाईकांच्या नावांऐवजी सरकारी योजनांची नावं, कुठं होतेय चर्चा?

| Updated on: Jun 17, 2023 | 7:01 AM

VIDEO | जाधव कुटुंबियांची अनोखी पत्रिका होतेय व्हायरल, काय आहे वेगळपण की सोशल मिडीयावर या अनोख्या लग्न पत्रिकेची होतेय चर्चा

अहमदनगर : जून हा महिना शेवटचा लग्न सराईचा महिना असल्याने विवाह करणाऱ्या वधू-वराच्या कुटुंबियांची चांगलीच धावपळ उडाली आहे. कारण यानंतर थेट नोव्हेंबरमध्ये लग्नाच्या तारखा असल्याने दोन्ही पक्षाकडून एकच लगबग सुरू आहे. दरम्यान, अहमदनगरच्या जाधव कुटुंबीयांनी अनोखी लग्न पत्रिका छापली आहे. पत्रिकेमध्ये नातेवाईकांची नावे टाकण्यापेक्षा त्यांनी सरकारच्या योजनांची माहिती दिली आहे. यामध्ये आयुष्यमान भारत, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी यासारख्या महत्वाच्या आरोग्य योजनांसह इतरही योजनांची माहिती छापण्यात आली आहे. शेकडो कुटूंबांना आपण लग्नाची पत्रिका पोहचवतो. यामाध्यमातून या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचल्यास त्याचा लोकांना अधिक फायदा होवू शकतो अी भुमिका जाधव कुटूंबाने व्यक्त केलीय.

Published on: Jun 17, 2023 07:01 AM