विखेंची डोकेदुखी वाढणार? निलेश लंके यांच्या पत्नी सुजय विखे यांच्या विरोधात लोकसभा लढणार?

विखेंची डोकेदुखी वाढणार? निलेश लंके यांच्या पत्नी सुजय विखे यांच्या विरोधात लोकसभा लढणार?

| Updated on: Oct 20, 2023 | 10:58 AM

VIDEO | अहमदनगरला राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके या सुजय विखेंच्या विरोधात लोकसभेला लढणार? आमदार निलेश लंके हे पारनेर मतदारसंघ सोडणार नसल्याने विखेंच्या विरोधात आपल्या पत्नीला लोकसभेच्या मैदानात उतरविणार?

अहमदनगर, 20 ऑक्टोबर 2023 | अहमदनगरला राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके या सुजय विखेंच्या विरोधात लोकसभेला लढणार असल्याच्या चर्चेला सध्या उधाण आलंय. त्यामुळे पुन्हा एकदा विखेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या नवरात्र उत्सवानिमित्त राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्याकडून महिलांना मोहटा देवी यात्रा घडवली जातेय. यानिमित्त शेवगाव-पाथर्डी मतदार संघात लावण्यात आलेल्या पोस्टरवर पहिल्यांदाच राणी लंके यांचा फोटो झळकले आहे. त्यामुळे राणी लंके या खासदारकीला उभे राहणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे. आमदार निलेश लंके हे पारनेर मतदारसंघ सोडणार नसल्याने विखेंच्या विरोधात आपल्या पत्नीला लोकसभेच्या मैदानात उतरविणार असल्याच्या चर्चा सध्या जिल्ह्याभरात सुरू आहे. तर माझ्याविरोधात कुणी उभं राहिले तरी यश भाजप आणि महायुतीलाच मिळणार असल्याचे विखे म्हणाले.

Published on: Oct 20, 2023 10:55 AM