उगाच माझ्या वाटेला येऊ नका, 2024 ला एकदाच कार्यक्रम करून टाकू!; नितेश राणे यांचा कुणाला इशारा
Nitesh Rane On Sangram Jagtap : भाजप आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर टीका केली आहे. पाहा ते काय म्हणालेत...
अहमदनगर : भाजप आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर टीका केली आहे. अहमदनगर शहरातील कापड बाजारात व्यापाऱ्यावरील हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांनी संग्राम जगताप यांच्यावर निशाणा साधलाय. “स्थानिक आमदार तुम्हाला वाचवायला येणार का?, असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे.उगाच माझ्या वाटेला येऊ नका. 2024 जवळ आहे जो आमदारांचा कार्यक्रम करायचा आहे तो एकदाच करून टाका. मी स्वतः प्रचाराला येणार आणि एकदाच या लोकांना हिंदूंची ताकद दाखवणार आहे, असंही नितेश राणे म्हणाले आहेत. नितेश राणे अमहमदनगरमध्ये बोलत होते.
Published on: Apr 19, 2023 08:17 AM
Latest Videos
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट

