बेसन आणि सोयाबीनच्या नावाखाली पोत्यात सापडला 50 लाखांचा गुटखा; माल तर गेलाच कंटेनरही जप्त

बेसन आणि सोयाबीनच्या नावाखाली पोत्यात सापडला 50 लाखांचा गुटखा; माल तर गेलाच कंटेनरही जप्त

| Updated on: Jun 04, 2023 | 1:44 PM

अहमदनगर पोलीसांनी सतर्कता दाखवत तब्बल 50 लाख रूपये किंमतीचा गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला कंटेनर जप्त केला आहे. याबाबत माहिती अशी की, कोपरगाव तालुका पोलिसांना अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या कंटेनरच्या बाबतीत माहिती मिळाली होती.

कोपरगाव (अहमदनगर) : दोन नंबराचा धंदा करणारे काय शक्कल लढवतील हे सांगता येत नाही. पण जर पोलीस सतर्क असतील तर कोणी कितीही हुशारी दाखवली तरी त्याचं पितळ उघडं करण्याचं काम होतचं. असचं अहमदनगर पोलीसांनी सतर्कता दाखवत तब्बल 50 लाख रूपये किंमतीचा गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला कंटेनर जप्त केला आहे. याबाबत माहिती अशी की, कोपरगाव तालुका पोलिसांना अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या कंटेनरच्या बाबतीत माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे पोलिसांनी संपुर्ण तयारी करत येसगाव शिवारात सापळा लावला होता. येसगाव शिवारात कंटेनर येताच पोलिसांनी तो ताब्यात घेतला. आधी यात बेसन आणि सोयाबीनच्या गोण्या असल्याचे समोर आले. मात्र अधित तपासणी केली असता त्यातून गुटख्याची वाहतूक होत असल्याचे उघड झाले. हा प्रतिबंधित गुटखा तब्बल ५० लाख रुपयांचा होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने चोरट्या वाहतुकीचा डाव फसला. त्यानंतर पोलिसांनी तो माल आणि कंटेनर ताब्यात घेतला आहे.

Published on: Jun 04, 2023 01:44 PM