सामाजिक कार्य, लोकांचा राबता, वाढदिवसाचे केक, अन् आठवणींची शिदोरी; जयंतीदिनी लक्ष्मण जगताप यांची लेक गहिवरली…
15 फेब्रुवारीला लक्ष्मण जगताप यांची जयंती होती. यावेळी जगताप कुटुंबाला त्यांच्या आठवणीने गहिवरून आलं. जगताप यांची कन्या ऐश्वर्या जगताप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. त्या काय म्हणाल्या आहेत, पाहा...
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होतेय. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अशात काल, 15 फेब्रुवारीला लक्ष्मण जगताप यांची जयंती होती. यावेळी जगताप कुटुंबाला त्यांच्या आठवणीने गहिवरून आलं. जगताप यांची कन्या ऐश्वर्या जगताप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “आम्हाला कधी अस वाटलं नव्हतं की भाऊंची जयंती साजरी करावी लागेल. त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.म्हणून मी आईच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. भाऊंना लोक कधी विसरू शकत नाहीत. भाऊ नेहमी आमच्या मनात राहतील. भाऊंच्या वाढदिवसाला सातशे ते आठशे केक यायचे. ते आम्ही अनाथ आश्रमात द्यायचो, असं म्हणत ऐश्वर्या यांनी आपल्या आठवणी जागवल्या. प्रत्येक व्यक्ती म्हणतोय आम्ही तुमच्या पाठिशी आहोत. ही निवडणूक सहानुभूतीची नसून भाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आहे, असंही त्या म्हणाल्या.