“जर गद्दारी हा त्यांचा स्वाभिमान असेल तर…”, अजय चौधरी यांचा शिवसेनेवर हल्लाबोल, म्हणाले…
काल शिवसेनेचा 57 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. शिवसेनेच्या इतिहासात आज पहिल्यांदा दोन वर्धापनदिन साजरे करण्यात आले. यावर ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : काल शिवसेनेचा 57 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. शिवसेनेच्या इतिहासात आज पहिल्यांदा दोन वर्धापनदिन साजरे करण्यात आले. यावर ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आतापर्यंतच्या वर्धापनदिनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी षण्मुखानंद हॉलमधून मार्गदर्शन केलं. या हॉलमधून ते संपूर्ण महाराष्ट्राला संबोधीत करत होते. त्या षण्मुखानंद हॉलमधून ज्या शिवसेनेचा वर्धापनदिन होतोय ती शिवसेना खरी आहे. बाकीचं आहे ते अळवावरचं पाणी आहे. जर गद्दारी करणं हे स्वाभिमान असेल तर मराठीच्या डिक्शनरीतून स्वाभिमान शब्दाच अर्थ बदलावा लागेल, असंही अजय चौधरी म्हणाले.
Published on: Jun 20, 2023 07:52 AM
Latest Videos