अजितदादा शरद पवार यांना भेटले, कारण नेमकं काय? शिवसेना म्हणतेय, ‘आम्हाला धोका….’
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर वाढदिवसांच्या निमित्ताने पहिल्यांदाच अजितदादा शरद पवारांना भेटले. संसदेचं अधिवेशन सुरू असल्याने शरद पवार हे दिल्लीत आहेत.
शरद पवार यांचा १२ डिसेंबर रोजी ८४ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्त अजित पवार यांनी कुटुंबीय आणि नेत्यांसह शरद पवारांची भेट घेतली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर वाढदिवसांच्या निमित्ताने पहिल्यांदाच अजितदादा शरद पवारांना भेटले. संसदेचं अधिवेशन सुरू असल्याने शरद पवार हे दिल्लीत आहेत. दिल्लीच्या निवासस्थानी शरद पवार येताच सुप्रिया सुळे, अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना घेण्यासाठी आल्यात. भाचा पार्थ पवार यांना देखील जवळ घेत सुप्रिया सुळेंनी विचारपूस केल्याचे पाहायला मिळाले. जवळपास २० मिनिटांच्या भेटीनंतर आपण साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आल्याचे सांगितले. दिल्लीतील अधिवेशन आणि राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर देखील चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, अजित पवारांसोबत छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते. दोन्ही पवारांची भेट दिल्लीत झाली. मात्र या भेटीनंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांच्या भेटीनं वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. बघा काय म्हणाले संजय शिरसाट?