Ajit Pawar | कोरोनाचा नवा विषाणू जगभरात पसरतोय, लस घ्या; अजित पवारांचं जनतेला आवाहन
नवीन विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतोय. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतून विमान येऊ नये यासाठी सरकारने खबरदारी घ्यावी. यावर लस अजून उपलब्ध नाही. हा वेगाने पसरणारा विषाणू आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात काल बैठक घेतली आहे. मुख्यमंत्रीही या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे नागरिकांनीही खबरदारी घ्यावी, असं अजित पवार म्हणाले.
नाशिकच्या कळवणमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवा कोरोना विषाणू ओमिक्रॉनच्या प्रसारावरुन चिंता व्यक्त केली आहे. तसंच नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. नवीन विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतोय. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतून विमान येऊ नये यासाठी सरकारने खबरदारी घ्यावी. यावर लस अजून उपलब्ध नाही. हा वेगाने पसरणारा विषाणू आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात काल बैठक घेतली आहे. मुख्यमंत्रीही या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे नागरिकांनीही खबरदारी घ्यावी, असं ते म्हणाले.
मी काल पुण्यात कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. आज मुख्यमंत्री आढावा घेत आहेत. राजेश टोपेही आढावा घेत आहेत. साडेसात हजार कोटी रुपये आरोग्य खात्याला दिले आहेत. ऑक्सिजन, रुग्णवाहिका आणल्या आहेत. नवीन संकट येऊ नये म्हणून खबरदारी घेण्यासाठी केंद्राला विनंती करण्यात येणार आहे, असं सांगतानाच दुबईतून एक दाम्पत्य पुण्यात आलं होतं. त्यातून चालकाला कोरोना झाला आणि सर्वत्र कोरोना पसरला असंही त्यांनी सांगितलं.