Ajit Pawar : माजी पोलीस आयुक्तांकडून झालेल्या ‘त्या’ गंभीर आरोपांवर अजित पवार म्हणाले…
VIDEO | माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्याकडून नाव न घेता अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप, माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी केलेल्या दाव्यामुळे अजित पवार यांच्यासमोर अडचण वाढणार का? असा सवाल उपस्थित केला जात असताना अजित दादांनी ते आरोप फेटाळले
पुणे, १५ ऑक्टोबर २०२३ | अजित पवार यांनी मीरा बोरवणकरांचे आरोप फेटाळले आहेत. जमिनींचा लिलाव करण्यासाठी मंत्र्यांना कोणतेही अधिकार नाहीत. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच सरकारी जमिनींचा लिलाव होतो, असे वक्तव्य करून अजित पवार यांनी माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी नाव न घेता केलेल्या गंभीर आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. पुण्यातील येरवडा येथील तीन एकर जमीन पालकमंत्र्यांनी एका खासगी बिल्डरवर दिली, असल्याचा गंभीर आरोप मीरा बोरवणकर यांनी ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकातून अजित पवार यांच्यावर केला आहे. दरम्यान अजित पवार यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. लिलावाच्या निर्णयाला आपण त्यावेळी विरोध केल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान या पुस्तकात मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोपांनंतर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसकडून अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात येतोय.

पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO

तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती

अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?

पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा...
