राष्ट्रवादीमध्ये नेमकं घडतंय काय? दिलीप वळसे पाटील आणि अमोल कोल्हे यांची भेट, चर्चा सुरू

राष्ट्रवादीमध्ये नेमकं घडतंय काय? दिलीप वळसे पाटील आणि अमोल कोल्हे यांची भेट, चर्चा सुरू

| Updated on: Nov 14, 2023 | 3:21 PM

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट तर दुसरा शरद पवार गट पडले. इतकंच नाहीतर दोन्ही गट एकमेकांवर सातत्याने आरोप-प्रत्यारोप करताना दिसताय. अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे यांची मंचर येथे भेट झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चांना उधाण

पुणे, १४ नोव्हेंबर २०२३ | गेल्या काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही आमदार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेत. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. एक अजित पवार गट तर दुसरा शरद पवार गट. इतकंच नाहीतर दोन्ही गट एकमेकांवर सातत्याने आरोप-प्रत्यारोप करताना दिसताय. अशातच अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे यांची मंचर येथे भेट झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चांना उधाण आले आहे. तर ही सदिच्छा भेट असून दोघांनी एकमेकांना दीपावली पाडवा आणि बलिप्रतिपदेच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्याचे सांगितले जात आहे. तर दिलीप वळसे पाटील शरद पवार गटात सामील होणार का? अशा चर्चांना देखील उधाण आले आहे.

Published on: Nov 14, 2023 03:21 PM