राज ठाकरेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार? अजित पवार गटानं गाठलं पोलीस स्टेशन अन्...

राज ठाकरेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार? अजित पवार गटानं गाठलं पोलीस स्टेशन अन्…

| Updated on: Aug 01, 2024 | 5:36 PM

राज ठाकरे स्वतःच्याच कार्यकर्त्याच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा गंभीर आरोप अजित पवार गट राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला आहे. जय मालोकरच्या मृत्यूवरून उमेश पाटील यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका करत गंभीर आरोप केला आहे. बघा काय केला हल्लाबोल करत गंभीर आरोप?

राज ठाकरे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून पोलिसांकडे करण्यात आली आहे. राज ठाकरे स्वतःच्याच कार्यकर्त्याच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा गंभीर आरोप अजित पवार गट राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला आहे. जय मालोकरच्या मृत्यूवरून उमेश पाटील यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका करत गंभीर आरोप केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या जय मालोकार या तरुणाचा मृत्यू झाला. जय मालोकर याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. जय मालोकार हा मनसे कार्यकर्ता आहे. अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली होती. ही टीका मनसे कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली होती. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी अकोल्यात अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला होता. दरम्यान, यानंतर अकोल्यात झालेल्या मिटकरींच्या कारवरील हल्लाप्रकऱणात जय मालोकर याचा मृत्यू झाला. यावरून उमेश पाटील आक्रमक झाले आहेत.

Published on: Aug 01, 2024 05:36 PM